पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी, उपचारा दरम्यान भाजी विक्रेत्याचा मृत्यू

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर

बारामतीमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याचा उपचारा दरम्यान गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. यामुळे बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बारामतीमध्ये कोरोनाचे ६ रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा आज मृत्यू झाला. या भाजी विक्रेत्याच्या मुलाला, सुनेला आणि दोन नातींना कोरोनाची लागण झाली आहे. तर बारामतीमध्ये आणखी एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. 

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ३,६३४ मुंबईकरांवर गुन्हा दाखल

बारामती शहरातील समर्थनगर भागातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वी भाजी विक्रेत्याचा कोरोना तपासणी अहवाल आला. त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. 

लॉकडाऊन इफेक्ट, इंधन वापरामध्ये दशकातील सर्वात मोठी घट

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भाजी विक्रेत्याच्या घरातील चार सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. रात्री उशिरा त्यांचा तपासणी अहवाल आला. यामध्ये भाजी विक्रेत्याचा मुलगा, सून आणि दोन नातींना  एक आणि आठ वर्ष) कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा भाजीविक्रेता ज्या भागात राहतो त्या ठिकाणचा परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुप्पट