पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू

कोरोना विषाणू

पुण्यामध्ये कोरोना विषाणूने पहिला बळी घेतला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २२ मार्च रोजी या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णांला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यात या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

अशीही मदत..., वडिलांच्या तेराव्याऐवजी गरिबांना केले अन्नदान

पुण्यामध्ये कोरोनाचे ३१ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर पुण्याच्या नायडू रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. तसंच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणेकरांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

वायफळ खर्च टाळा, काटकसर करा, शरद पवार यांचा सल्ला

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज आणखी २६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक याठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने सर्वांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. 

जगातील दीड लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे, ८० % जणांना रुग्णालयाची नाही गरज