पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलासादायक! पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

कोरोनाच्या संशयितांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना पुण्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आणखी ३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यांची मुलगी, सहप्रवासी आणि कॅबचालक यांना डिस्चार्ज देण्यात आहे. पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात २४ तासांत ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सरकार पहिल्यांदाच योग्य मार्गावर, राहुल गांधींची प्रतिक्रिया

पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यांची मुलगी, दुबई प्रवासातील सहप्रवासी आणि या दाम्पत्यांना मुंबईवरुन पुण्याला आणणारा कॅबचालक यांचा दुसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना घरी सोडण्यात आले. बुधवारी सकाळी पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यांना नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीरित्या जिंकल्यामुळे या दाम्पत्यांना रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्प देत शुभेच्छा दिल्या.

कोविड 19 : MCA कडून राज्य सरकारला ५० लाखांची मदत

९ मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पहिल्या दाम्पत्यांना नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हे दाम्पत्य राज्यातील कोरोना बाधित पहिले रुग्ण होते. दुबई सहलीवरून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. या दाम्पत्यांच्या मुलीला, त्यांना मुंबईवरुन पुण्यात आणणाऱ्या कॅब चालकाला आणि सहप्रवाशाला देखील कोरोनाची लागण झाली होती. गेल्या  १४ दिवसांपासून त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.