पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. या रुग्णासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४३ वर पोहचला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील कोरोना विषाणूची लागण झालेला हा ११ वा रुग्ण आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोनाची बाधा झालेल्या ८ जणांवर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांत शहरात ३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १९ इतका झाला आहे.
कोरोनाशी लढा : पुण्यातील सर्व रेस्तराँ आणि बार बुधवारपासून बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये संबंधित रुग्णावर यंशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांतील लोकांनाही विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नव्या आढलेला रुग्ण हा परदेशाची वारी करु आला आहे की, संपर्कातून त्याला कोरनाची बाधा झाली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
कोरोना: राज्यात आठ नव्या लॅब सुरु करणार -आरोग्यमंत्री
पुण्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत राज्य सरकारने कोरोनाच्या रुग्णासाठी खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयातही विलगीकरणाची तयारी केली आहे. पुण्यातील १० खासगी रुग्णालयात विलगीकरणासाठी ४१ बेडची तर पिंपरी-चिंचवडमधील ८ खासगी रुग्णालयांना ५७ बेडची मान्यता दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती.