पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यातील आकडा ४१ वर

पुण्यातील नायडू रुग्णालय परिसरातील एक क्षण (Pratham Gokhale/HT Photo)

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. या रुग्णासह पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा आता १७ वर पोहचला असून मुंबईतील आणखी एका रुग्णासह राज्यात ४१ लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.  पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात नव्याने आढळलेला रुग्ण हा अमेरिकेहून भारतात परतला आहे. १४ मार्चला संबंधित रुग्ण अमेरिकेहून दुबईमार्गे मुंबईला परतला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. मागील २४ तासांत ३२ जणांना घरी पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

सरकारी कार्यालये सात दिवस बंद राहणार, राज्य सरकारचा निर्णय

दोन दिवसांपासून परदेशातून पुण्यात येणाऱ्यांना २४ तास क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला क्वॉरंटाईनची क्षमता ५२० इतकी असूनत बालेवाडी परिसरात आणखी एक क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने १५० पथके स्थापन केली असून सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये १०० तर पुण्यासाठी ५० अशी विभागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाशी लढा : पुण्यातील सर्व रेस्तराँ आणि बार बुधवारपासून बंद

क्वॉरंटाईचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करु
परदेशातून परतणाऱ्या नागरिकांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. २४ तास त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात येत असून त्यांना घरीच क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात येत आहे. हा सल्ला न पाळता समाजात वावरणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही  पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. एका व्यक्तीसाठी समाजाला त्रास होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, असेही ते म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus 1 more covid 19 cases reported positive from pcmc maharashtra state tally 40 patient