पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सूचनांचे पालन करा : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. तसंच गर्दी आणि प्रवास टाळा. त्याचसोबत लग्न समारंभ, अंत्यविधी, दहावा-तेराव्याला गर्दी करु नका. शक्य असेल तर लग्न समारंभ पुढे ढकला, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारचा आणखी एक महत्त्वाचा आदेश

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे १५ दिवस खूप महत्वाचे आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे. राज्य सरकार सक्षम असून केंद्राला निधी मागण्याची गरज नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री यामध्ये जातीने लक्ष घातल आहेत. ते महाराष्ट्र सरकारच्या संपर्कात असून सातत्याने आढावा घेत आहेत. पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी कर्फ्यू लागू केला आहे. त्याची सर्वांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.

राज्यातील सर्व नागरिक, व्यापारी, उद्योजकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. लोकांनी घरामध्येच थांबून कामं करावी. सर्वांनी सावध रहावे. राज्यावर किंवा देशावर संकट येते त्यावेळी सर्वांनी एकजुटीने त्याचा सामना करायला पाहिजे, असे अजित पवारांनी सांगितले. तर पुणे, पिंपरी-चिंचवड येथील व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल अजित पवारांनी त्यांचे आभार मानले.

जनता संचारबंदीमुळे रविवारी दिल्ली मेट्रो सेवा बंद राहणार

दरम्यान, कोरोनाबाबत जिल्हापातळीवरचा निर्णय घेण्याचा अधिकार विभागिय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ग्रामीण भागात रुग्णालय तयार ठेवले आहेत. कोणतीही अडचण येणार नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. कोरोनाबाबतच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. नागरिकांना तीन महिन्याचे अन्नधान्य एकत्र देण्यात येणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले. तसंच, परदेशातून आलेल्याकडे संशयाने बघू नका. संशयितावर बहिष्कार घातल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.