पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोलिस खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पुण्याच्या आयुक्तांचे नवे पाऊल

के. वेंकटेशम

पोलिस खात्यातील भ्रष्टाचार आणि लाचखोरी रोखण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी आतापर्यंत विविध पावले उचलली आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकाच दिवसात सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. आता या पुढचे पाऊल टाकत त्यांनी जर कोणता पोलिस तुमच्याकडे लाच मागत असेल, तर तुम्ही पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार दाखल करू शकता, असे म्हटले आहे. 

कोणत्याही नागरिकाने पोलिसांना लाच दिली नाही पाहिजे. जर कोणाला लाच द्यावी लागली, तर लगेचच त्यांनी पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर त्याबद्दल माहिती द्यावी. आम्ही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कडक पावले उचलू, याची हमी पोलिस आयुक्तांनी दिली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्त ट्रेंडिंगमध्ये, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पोलिस खात्यातील कोणत्याही कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ८९७५२८३१०० या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर नागरिकांनी आपल्या तक्रारी द्याव्यात, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. या सर्व तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वानवडी पोलिस ठाण्यातील अतुल शेटे, विकास टेमगिरे, कृष्णा ननावरे आणि बाळू यादव हडपसर पोलिस ठाण्यातील सुमित ताम्हाणे आणि नामदेव बंडगर यांनी लाच मागितल्याच्या आरोपाखाली त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.