पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पलूस-कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुण्यामध्ये बुधवारी रात्री उशिरा विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये विश्वजित कदम थोडक्यात बचावले. त्यांना कोणतिही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

संजय राऊत म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण नाही पण...

मुंबईतील पक्षाची बैठक आटोपल्यानंतर विश्वजित कदम बुधवारी रात्री पुण्याकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीला रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यामध्ये अपघात झाला. विश्वजित कदम यांची गाडी झाडाला धडकली. या अपघातामध्ये विश्वजित कदम आणि त्यांचे चालक सुखरुप आहेत. विश्वजित कदम यांच्या डाव्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. गाडीतील एअर बॅगमुळे ते थोडक्यात बचावले. अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सर्व वैद्यकिय तपासणी केल्यानंतर विश्वजित कदम कराडच्या दिशेने रवाना झाले आहेत.  

'महाराष्ट्रासाठी आता एकच गोड बातमी, शिवसेनेचा मुख्यमंत्री'