आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. पुण्यातील काँग्रेस भवन कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडला. दोन मजली काँग्रेस भवनातील खिडक्या, खुर्च्या, टेबलची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काँग्रेस भवनावर धाव घेतली. आक्रमक झालेल्या संग्राम थोपटेंच्या कार्यर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भारताकडून चांद्रयान-३ची घोषणा, २०२० मध्येच पुन्हा मोहिम
संग्राम थोपटेंना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. पुण्यातील काँग्रेस भवनावर निषेधाचा बॅनर घेऊन ते दाखल झाले आणि त्यांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली. संग्राम थोपडेंवर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एकाही मंत्र्याचा, नेत्याचा सत्कार करुन देणार नाही असा आक्रमक पवित्रा या संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी घेतला आहे.
अर्थमंत्र्यांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; १०२ लाख कोटींच्या योजनांची
संग्राम थोपटे प्रामाणिकपणे काँग्रेससोबत राहिले. काँग्रेसने थोपटेंना डावल्याने काम केले असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे हे आम्ही सहन करणार नाही. बाळासाहेब थोरात यांनी दिलेला शब्द पाळला नाही. तिसऱ्यांदा संग्राम थोपटे निवडून आले आहेत. नवीन लोकांना मंत्रिपद दिली जातात. संयमाने आम्ही त्यांना सांगितले. त्याची दखल घेतली नाही आमच्या संयमाचा बांध सुटला आहे, असे संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी सांगितले.