पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जे घडले ते चुकीचे आणि निंदनीय आहे: संग्राम थोपटे

आमदार संग्राम थोपटे

आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी बुधवारी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली. या घटनेवर संग्राम थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे घडले ते चुकीचे आणि निंदनीय असल्याचे संग्राम थोपटेंनी सांगितले. तसंच, नेतृत्व जे काही निर्णय घेतील त्यावर मी सहमत आहे आणि भविष्यातही मी त्यास सहमती देईन, असे त्यांनी सांगितले.

कर्ज वसुलीसाठी विजय मल्ल्याची संपती विकणार; पीएमएलए कोर्टाची परवानगी

संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुण्यातील दोन मजली काँग्रेस भवनातील खिडक्या, दरवाजांच्या काचा फोडल्या. त्यानंतर काँग्रेस भवनातील खुर्च्या, टेबल, टीव्हींची तोडफोड केली. यावेळी संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. संग्राम थोपटे काँग्रेससोबत  प्रामाणिकपणे राहिले. काँग्रेसने थोपटेंना डावल्याने काम केले असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला होता. 

चांद्रयान-३ ला सरकारची मंजुरी, २०२० इस्रोसाठी महत्त्वाचे वर्ष

दरम्यान, काँग्रेस भवनातील तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांवर काहीच कारवाई केली नाही. दरम्यान, मंगळवारी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा झाला. या शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रिपदावरुन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.

अयोध्येत मशिदीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त सरकारने