पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशाची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार गोंधळलेले आहे. देशाची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरात आंदोलने होत आहे. त्याकडे नियंत्रण नाही. दुहेरी कचाट्यात नागरिक सापडले आहेत. इतिहासाचा संपर्क न घेता दिशाभूल केली जात आहे. नरेंद्र मोदींनी इतिहास वाचावा आणि मग बोलावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.  

अर्थसंकल्पावरील सीतारमन यांचं भाषण म्हणजे सत्यनारायणची कथाः चिदंबरम

पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते. कुठल्याही स्वतंत्र विचारांच्या वक्त्याला बोलू दिले जात नाही, असे सगळ्या ठिकाणी घडत आहे. दबाव आणून निमंत्रण रद्द करायला लावतात, गळा घोटायचे काम सुरु आहे, असे त्यांनी म्हटले. 

भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे देण्याला राज्य सरकारचा पुणे कोर्टात विरोध

राज्यात पुन्हा मिशन कमळ या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली. त्यांची वक्तव्ये किती गांभीर्याने घ्यायचे? असे म्हणत, आधी दिल्ली निवडणुका भाजपने पहाव्य़ात मग राज्यातील राजकारणावर बोलावे असा टोला त्यांनी लगावला.

सरकार चालवताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्या नुसारच राज्य सुरू आहे, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.