पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चाकण एमआयडीसीत कंपनीत घुसून मालकाची हत्या

पिंपरीत तरुणाची हत्या

पुण्यातील चाकण एमआयडीसीत खळबळजनक घटना घडली आहे. चाकण एमआयडीसीतील एका कंपनीत घुसून त्या कंपनीच्या मालकाची ५ ते ६ अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. रात्री उशिरा याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. प्राथमिक तपासानुसार पोलिसांना चाकण परिसरातील अवैध रिक्षाचालकांवर संशय असून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. मृत कंपनी मालकाचे नाव हरीशचंद्र किसनराव देठे (४५) असे असून ते विश्रांतवाडी येथे राहतात. ते मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 

'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसीत देठे यांच्या मालकीची व्हीएचडी इंजिनिअरींग कंपनी आहे. नेहमीप्रमाणे देठे हे सकाळी कंपनीत आले. त्यावेळी त्यांची कंपनीच्या प्रवेशद्वारावर काही लोकांशी वाद झाला. त्यानंतर दुपारी ३ वाजता ५ ते ६ अज्ञात व्यक्तींनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. गेटवरील आवाज ऐकून देठे हे बाहेर आले. त्यावेळी या लोकांनी देठे यांच्यावर मोठा दगड टाकला. त्यामुळे देठे हे कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ खाली पडले. त्यावेळी त्यांना मारहाण करणारे सर्वजण घटनास्थळावरुन पळून गेले. देठे यांना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

भीमा-कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही, उद्धव ठाकरेंचा खुलासा

यावेळी उपस्थित असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले असून हल्लेखोर हे एका रिक्षात आले होते. हल्लेखोरांपैकी एकाची पत्नी ही त्याच कंपनीत काम करत असल्याचे समजते. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन तपास पथके नेमली असल्याची माहिती, चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.

शिवसेनेची भूमिका जाहिरातदार ठरवत नाहीः उद्धव ठाकरे