पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंजवडी आयटी हबमधील कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश झुगारले

हिंजवडी आयटी हबमध्ये पोलिसांची पाहण

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक १९ रुग्ण आढळले आहे. अशामध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र हिंजवडी आयटी हबमधील कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारुन लावल्याचे चित्र पहायला मिळाले. 

 

दोन महायुद्धापेक्षाही कोरोनाचा प्रभाव भयावह : मोदी

हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी हिंजवडी आयटी हबमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले वर्क फ्रॉम होमच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली. मात्र यावेळी कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात कर्मचारी दिसून आले. अजूनही काही आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास परवानगी दिली नसल्याचे दिसून आले.  

कमलनाथ सरकारला SCचा दणका; उद्या बहुमत सिध्द करण्याचे

हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले की, 'आम्ही सर्व कंपनींना भेट देऊन या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यास सांगितले. आयटी हबमध्ये दिवसाला २५ हजार कर्मचारी असतात. आज १४०० कर्मचारी हजर होते. दरम्यान, या कंपन्यांनी उद्यापर्यंत जास्तीत जास्त कर्मचारी कमी करु, असे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती