पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजितदादा आपण उगाच इतकी वर्षे वेगळे राहिलो, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा आपण एवढी वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आधीच एकत्र यायला हवे होते, असे उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी काढले.

डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का?; काँग्रेस नेत्याचा सवाल

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, आता जे एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी. त्यामुळे चांगले काम करुन दाखवल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही, आपण अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार हे माझे सरकार आहे, ही भावना आज प्रत्येक गोर-गरिबांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याला गर्दी झाली आहे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवनेरी आणखी कशी सजावायची, याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांचे कार्य लाखोंना प्रेरणा देत राहिल - नरेंद्र मोदी

राज्यात बुधवारी शिवजयंतीचा उत्साह दिसतो आहे. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे, मिरवणुकांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकार २३ कोटी रुपये देईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.