पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेः सहलीवरुन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारला अपघात, ९ जण ठार

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्तीजवळ रात्री उशिरा अपघात झाला

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्तीजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघतात ९ जण ठार झाले आहेत. मृत हे महाविद्यालयीन विद्यार्थी असून सर्वजण यवतचे रहिवासी आहेत. ते रायगडला फिरायला गेले होते. रायगडहून परतताना हा अपघात झाला. लोणी-काळभोर पोलिस तपास करत आहेत.

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमंद अश्पाक अत्तार, परवेज अश्पाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत दिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजीज (सर्वजण रा. यवत) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे पंचविशीतील आहेत. 

अधिक माहिती अशी की, यवत येथील काही महाविद्यालयीन विद्यार्थी हे शुक्रवारी सकाळी यवतहून अर्टिगा कारमध्ये रायगडला फिरायला गेले होते. त्यानंतर ते रात्री यवतला परत येत होते. रात्री उशिरा अडीचच्या सुमारास कदमवाक ग्रामपंचायतीजवळ आल्यानंतर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला ओलांडून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातस्थळी पोलिसांनी त्वरीत धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर सुमारे दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सहलीला गेल्यानंतर काढलेले छायाचित्र. सर्वजण जागीच ठार झाले आहेत.