पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गायक आनंद शिंदे यांच्या कारला इंदापूरजवळ अपघात, पायाला दुखापत

गायक आनंद शिंदे

प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या कारला इंदापूरजवळ अपघात झाला. सुदैवाने आनंद शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. परंतु, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास झाला. आनंद शिंदे यांची प्रकृती स्थिर असून, प्राथमिक उपचारानंतर ते सांगोल्याला (जि. सोलापूर) रवाना झाले. 

कौतुकास्पद! पुण्याच्या मूर्तीकाराकडून पूरग्रस्तांसाठी अनोखी भेट

अधिक माहिती अशी, अधिक माहिती अशी, आनंद शिंदे हे पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूरहून सांगोल्याला जात होते. त्यावेळी वरकुटे येथे शिंदे यांची कार एका डंपरला मागून जाऊन धडकली. त्यात ते किरकोळ जखमी झाले. अपघातात त्यांचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात आनंद शिंदे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येते. इंदापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ते सांगोल्याकडे रवाना झाले. या अपघातात शिंदे हे ज्या वाहनातून प्रवास करत होते. त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात अंध मुलींनी फोडली पुस्तकांची अनोखी दहीहंडी