पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुधारित नागरिकत्व कायदा प्रत्येक गरिबाच्या विरोधात :उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर

सुधारित नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिम समाजाच्याच नव्ह तर प्रत्येक गरीबाच्या विरोधातील आहे, असे मत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. १५ टक्के मुस्लिमांच्या नावाखाली ८५ टक्के हिंदू समाजामध्ये दहशत निर्माण करुन त्यांच्यावर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  या कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचेही पाहायला मिळाले. 

जामिया गोळीबाराच्या घटनेनंतर प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा

भारत हा गांधींच्या विचाराचा देश आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. हा कायदा नागरिकत्वाला आव्हान देणारा असून या विरोधात प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगत उर्मिला यांनी कायद्याच्या विरोधातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.  महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित पुण्याच्या कोथरूड येथील गांधी भवन येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

जामिया परिसरातील गोळीबाराच्या घटनेवर अमित शहा म्हणाले...

या कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर,  बिशप थॉमस डाबरे, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी प्रमुख उपस्थिती होती. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन हा या कार्यक्रमाचा विषय होता.