पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात वाड्याची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

भिंत कोसळली

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पुण्यामध्ये एका वाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. गणेश पेठेतील बोरा हॉस्पिटलजवळ ही दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री अचानक वाड्याची भिंत कोसळली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. 

मला मातोश्री आणि वर्षाहून फोन येताहेत, विजय वडेट्टीवार यांचा दावा

वाड्याची भिंत पडत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने त्यामध्ये राहणाऱ्या आई आणि मुलाने वाड्याबाहेर पळ काढला त्यामुळे ते बचावले. हा वाडा खूप जुना झालेला असून तो धोकादायक स्थितीत होता. तरी देखील या वाड्यामध्ये हे दोघेजण राहत होते, अशी माहिती सांगण्यात येत आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात

दरम्यान, पुण्यामध्ये भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.  29 जून रोजी पुण्यातल्या कोंढवामध्ये इमारतीची सुरक्षा भिंत कोसळून मोठी दुर्घनटा घडली होती. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुण्याच्या आंबेगावजवळ सिंहगड कॅम्पसची सुरक्षा भिंत कोसळली होती. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओढू नका : प्रियांका गांधी