पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने गळा चिरून केली प्रियकराची हत्या

आईनेच केली पोटच्या लेकराची हत्या

लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीने प्रियकरांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याजवळील नऱ्हे गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. 

 

बंगालमध्ये राहणारे सर्व बांगलादेशी भारतीय नागरिक: ममता बॅनर्जी

महंतेश बिरादार (२७ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा सांगलीचा आहे. तो पुण्यामध्येच राहत होता. पुण्यातल्या नऱ्हे गावात राहणाऱ्या अनुराधा करे (२४ वर्ष) हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. महंतेशने लग्नाला नकार दिल्यामुळे त्यामुळे संतप्त झालेल्या अनुराधाने मंगळवारी पहाटे गळा चिरून त्याची हत्या केली. 

दिल्ली: कोरोनाच्या २४ संशयित रुग्णांना ITBP कॅम्पवर हलवले

महंतेशची हत्या केल्यानंतर अनुराधाने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

जयपूरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण; भारतात रुग्णांची संख्या ६ वर