पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा मृतदेह

तेजसा पाचाळ

पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) भागात एका तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी हा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला. तेजसा शामराव पाचाळ (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. ती घरात एकटीच होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्राथमिक पोलिस तपासामध्ये तिचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना उघडकीस आल्यावर सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दोन पत्नींसह नवऱ्याने आठव्या मजल्यावरून उडी मारली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा सिंहगड रस्त्यावर भाड्याने सदनिका घेऊन राहात होती. ती मूळची बीडमधील आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती नोकरीच्या शोधात पुण्यात राहात होती. तिची आईसुद्धा तिच्यासोबत राहायची. पण कौटुंबिक कार्यक्रमासाठी तेजसाची आई बीडला गेली होती. त्यामुळे ती घरात एकटीच होती. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. सोमवारी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान तेजसाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

'... म्हणून मी मध्य प्रदेशातील भाजप सरकारविरोधात बोलत नव्हते'

तेजसाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तिच्या कुटुंबियांनाही या घटनेबद्दल कळविण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.