पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे, उपमहापौरपदी तुषार हिंगे

महापौर उषा ढोरे आणि उपमहापौर तुषार हिंगे

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची शुक्रवारी निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ४० मतांनी निवडून आल्या. तर भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे हे बिनविरोध उपमहापौरपदी निवडून आले आहेत. याच दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी राज्यात हालचाल सुरू असलेल्या महा'विकास'आघाडी ही महापौर निवडणुकीसाठी एकजूट असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. 

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर

राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार स्वाती उर्फ माई काटे यांचा भाजपाच्या उमेदवार नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे यांनी ४० मतांनी पराभूत करत विजय मिळवला. स्वाती काटे यांना ४१ तर भाजपाच्या उमेदवार उषा ढोरे यांना ८१ मते मिळाली. राष्ट्रवादीने देखील महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आजच्या निवडणुकीच्या अगोदर १५ मिनिटे माघार घेण्यासाठी देण्यात आली होती. परंतु, राष्ट्रवादीने माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवत काटे यांना मतदान केले. तर मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले हे गैरहजर राहिले. 

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ

दरम्यान, उपमहापौरपदासाठी राजू बनसोडे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, नंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे तुषार हिंगे हे बिनविरोध निवडून आले.