पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज, उदयनराजेंची नाव न घेता शरद पवारांवर टीका

उदयनराजे भोसले आणि शरद पवार

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकामध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. या पुस्तकावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्वच राजकीय पक्षांचा समाचार घेतला. यावेळी शरद पवारांचा जाणता राजा म्हणून उल्लेख करणाऱ्यांना उदयनराजेंनी टोला लगावला. 'जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. जाणता राजा ही उपमा कोणालाही देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. 

'बांगलादेशमधील स्थलांतरित इन्फोसिसचा CEO झालेला बघायला

छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणी करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराजांसोबत तुलना करणे चुकीचे असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी मांडले. तसंच शिवाजी महाराज जगातले आदर्श व्यक्ती होते. महाराजांच्या नावाची उपमा देणाऱ्यांनी बुद्धी गहाण ठेवली असल्याची टीका त्यांनी केली. साडेतीनशे वर्षानंतर महाराजांचे नाव काढले तर चैतन्य निर्माण होते आणि अंगावर शहारे येतात. त्यांचे विचार आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करु शकतो. पण शिवजी महाराज कोणी होऊ शकत नाही, असे उदयनराजेंनी सांगितले. 

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

दरम्यान, शिवाजी महाराजांची बरोबरी करण्याएवढी कोणाची उंची नाही. गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करा पण थेट महाराज बनू नका, असे उदयनराजे भोसले यांनी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्यांना खडसावून सांगितले. शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. मात्र महाराजांच्या नावाचा दुरुपयोग करु नये. सोयीप्रमाणे प्रत्येकाने महाराजांच्या नावाचा वापर केला असल्याची टीका उदयनराजे भोसलेंनी केली. 

'अरे! ये गँग तो बनने से पहले ही टुकडे टुकडे हो गया...'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader udayan raje bhosale criticized opposition over sharad pawar known as a janta raja