पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दिल्ली दरबारात रंगणार सोहळा

उदयनराजे भोसले

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले खासदारकीचा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी भाजमधील मेगाभरतीसह उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल भाष्य केले. 

मागण्या मान्य न झाल्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश बारगळला

चंद्रकात पाटील म्हणाले की, उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या संपर्कात आहेत. आमच्या बाजूने प्रवेशासंदर्भात कोणतीही अडचण नाही. पण त्यांना आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूनेच प्रवेश लांबणीवर पडला होता. शेवटी ते राजे आहेत. त्यांचा निरोप आला की, प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होईल. तत्पूर्वी त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा उल्लेखही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

कुलभूषण जाधव प्रकरणात भारत पुन्हा 'आयसीजे'कडे दाद मागणार

उदयनराजे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केल्याचे पाहायला मिळाले होते. गुरुवारी उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य दिग्गज नेतेही उपस्थित होते. या भेटीनंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेश पक्का झाल्याची चर्चा सुरु झाली.

शनिवारी १४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्यनराजे दिल्ली दरबारात भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याचे समजते. भाजप प्रवेशानंतर १५ सप्टेंबर रोजी ते मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील महाजनादेश यात्रेत देखील सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.