पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट द्या : कोर्ट

भीमा-कोरेगाव प्रकरणातील सुनावणी

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना फॉरेन्सिक लॅब रिपोर्टच्या प्रती देण्याचे आदेश आज (शुक्रवारी) पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले. आरोपी सुरेंद्र गडलिंग आणि अरुण फेरेरा यांनी फॉरेन्सिक रिपोर्टची मागणी केली होती. 

 व्हेरी गुड! PM मोदींच्या पत्रकार परिषदेवर राहुल गांधीची प्रतिक्रिया

आरोपी सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत यांच्यावर १५ नोव्हेंबर २०१८ ला पहिले  तर २१ फेब्रुवारी २०१९ रोजी दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून आरोपी येरवडा तुरुंगात आहेत. बचाव पक्षाचे वकील रोहन नाहर यांनी या प्रकरणात दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण असून याबाबत आणखी कागदपत्रे  सादर करणे आवश्यक असल्याचे सांगत आरोपींना नियमित जामिन मिळावा, अशी बाजू मांडली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bhima Koregaon case: Session court Pune today ordered that FSL report copies should be provided to the accused