पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कोरेगाव हिंसाचार: गौतम नवलाखांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला

मुंबई उच्च न्यायालय

पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारातील आरोपी गौतम नवलाखा यांच्या याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने फक्त बॉम्ब फेकणाराच दहशतवादी नसतो, अशी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी गौतम नवलाखा यांच्याकडून उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. 

भीमा-कोरेगाव हिंसाचार : गौतम नवलाखा यांचे 'हिज्बुल'शी संबंध - पुणे पोलिस

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गौतम नवलाखा यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही. केवळ कोणाच्या लॅपटॉपमध्ये त्यांचे नाव आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. त्याचवेळी सरकारी वकिलांनी गौतम नवलाखा यांचे काश्मीरमधील फुटीरतावादी गटाचे काही नेते आणि दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध असल्याचे म्हटले आहे. पुणे पोलिसांच्या तपासावरून हा युक्तिवाद करण्यात आला आहे.  

पुणे पोलिसांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी गौतम नवलाखा यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी सध्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे झाली. आता न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bhima Koregaon case Bombay High Court reserves order on an application filed by activist Gautam Navlakha