पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमधील अविवाहितांचे वास्तव; पाणी नाही म्हणजे ना नोकरी, ना लग्न

बीडमधील अविवाहितांचे वास्तव; पाणी नाही म्हणजे ना नोकरी, ना लग्न (Akshay Rade/HT Photo

राज्यातील अनेक भागात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. मराठवाड्यातील परिस्थिती बिकट झाली असून पाणीटंचाईमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदापासून ४० किमी दूर असलेल्या एका दुर्गम गावाला याचा मोठा फटका बसला आहे. सुमारे २२०० लोकसंख्या असलेल्या या गावातील युवकांचा दुष्काळाने फक्त रोजगारच हिरावला नव्हे तर त्यांना अविवाहित राहण्यास भाग पाडले आहे.

भुसनरवाडी, डोमरी आणि दिसलेवाडी या गावात २५ ते ३० वयोगटातील सुमारे २०० युवक आहेत. आज या युवकांना आपला वैवाहिक जोडीदार शोधणे कठीण झाले आहे. या गावातील युवकांना आपली मुलगी देण्यास कोणी तयार होताना दिसत नाही. फक्त पाणी टंचाईच नव्हे तर गावात मोबाइल नेटवर्क नसल्याचेही कारण पुढे केले जाते. 

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अद्याप पावसाची प्रतिक्षाच

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा सुरु होऊन एक महिना झाल्यानंतरही पाटोदाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  डोमरी गावातील भूगर्भातील पाणी पातळी तीन मीटरपेक्षाही जास्त घटल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने सांगितले. दि. १ जून ते ११ जुलै या कालावधीत पाटोदा विभागात १२८.५ मिमी पाऊस पडला आहे. याच कालावधीत गतवर्षी या भागात १६९.३ मिमी पाऊस पडला होता.

नितीन भुसनर (३४) यांची स्वतःची अडीच एकर शेती आहे. मागील दीड वर्षांत त्यांना १० जणांनी विवाहासाठी नाकारले आहे. 'कोणीच आमच्या गावातील मुलांना मुलगी देऊ इच्छित नाही. पहिल्याच भेटीत ते आमच्या आई-वडिलांना पाण्यासाठी झगडताना पाहतात,' असे नितीन म्हणाले. ही स्थिती पाहिल्यानंतर पुढची बोलणी करण्यासाठी ते पुन्हा येतच नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

नितीन यांनी आणखी एक किस्सा सांगितला. गावात मोबाइल नेटवर्क नसल्यामुळेही एकदा आपले लग्न जुळले नसल्याचे ते म्हणाले. तुमच्या गावात मोबाइल नेटवर्क नाही त्यामुळे व्हॉटसअॅप चालत नाही, हे कारण देत बोलणी पुढे सरकलीच नाही.

वैभव भुसनर (२९) हे शेजमजुरी करतात. त्यांनी लग्नाची आशाच सोडून दिली आहे. माझ्या एका नातेवाईकाला लग्नासाठी मुलगीच मिळाली नाही. अखेर तो अविवाहितच मरण पावला. माझे ही लग्नाचे वय निघून गेले आहे. मलाही तशीच भीती वाटत आहे, अशी खंत वैभव यांनी व्यक्त केली. 

पिक विम्यासंदर्भात १७ जुलै रोजी शिवसेनेचा मोर्चा

गावात धनगर आणि मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे. ते दुसऱ्या समाजातील मुलींशी लग्न करण्यास तयार नाहीत.

गावच्या उपसरपंच सुरेखा भुसनर यांनी गावातील या भीषण वास्तवाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आमच्या गावात विवाह अनुरुप २५ ते ३० वयोगटातील २०० युवक आहेत. ते लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी झगडत आहेत. गावासाठी जास्तीचे पाण्याचे टँकर मंजूर करा यासाठी आम्ही अनेकवेळा अधिकाऱ्यांना भेटलो, निवेदने दिली. पण यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाही. सध्या संपूर्ण गाव ३ पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. 

ही समस्या फक्त डोमरी परिसरात नसून पाटोदा तालुक्यातील अनेक दुर्गम भागात आहे.

'शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर त्याचं पाप फडणवीस सरकारचं'