पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सासवड येथे मिलिंद एकबोटेंना मारहाण

मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. 

ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण; पतीनेच पत्नीला पेटवले?

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, पंडित मोडक, विवेक मोडक हे हंबीरराव मोहिते गो-शाळा चालवितात. ही गो-शाळा चालवण्यावरुन एकबोटे यांच्याबरोबर त्यांचा वाद होता. सासवडजवळ असलेल्या झेंडेवाडीत मंगळवारी सायंकाळी सितारामबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला एकबोटे आले होते. कार्यक्रमानंतर मारुती मंदिरात एकबोटे प्रसाद घेण्यासाठी बसले असताना मोडक आणि त्यांचे ४० ते ४५ समर्थक आले. त्यांनी एकबोटे व त्यांच्याबरोबरच्या तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकबोटे हे भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आहेत. त्यात तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. सासवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोलापुरात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या