पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा रद्द!

पुण्यातील मनसे सभेत पावसाचा व्यत्यय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा प्रचार शुभारंभामध्ये पावसाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नियोजित सभा अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पावसाचा जोर पाहता ही सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मनसे पदाधिकारी सभा होणारच या भूमिकेवर ठाम होते. मात्र पावसामुळे व्यासपीठ आणि बैठक व्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्यामुळे अखेर मनसेला ही सभा रद्द करावी लागली आहे.   

वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला आग; हार्बर रेल्वे विस्कळीत

राज ठाकरे यांच्या सरस्वती विद्या मंदिर मैदानातील सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र कालच्या पावसाने मैदानात चिखलाचे साम्राज्य झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे कार्यकर्त्यांनी स्थिती पूर्ववत करण्यासाठी मेहनत घेतली. मात्र आज पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसमोरील आव्हान आणखी वाढले. प्रचंड पावसामुळे सभेच्या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते त्याठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांचा आधार घेत पावसापासून आडोसा घेतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर अखेर पावसामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने विचारला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: assembly election maharashtra election 2019 mns leader raj thackeray rally in pune cancelled