पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या आरोपांमुळे आपल्याला धक्का बसला असून हे अत्यंत दुःखदायी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी इंदापूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने सभ्यतेचा गैरफायदा घेतल्याचे व दगाबाजी केल्याचे त्यांनी म्हटले होते. 

सभ्यपणाचा राष्ट्रवादीने गैरफायदा घेतला, हर्षवर्धन पाटलांचा आरोप

त्या म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांनी दगाबाजीचे पुरावे द्यावेत मी त्यांच्याबरोबर बैठकीस बसायला तयार आहे. इंदापूरच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसताना, हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. त्यांच्या भाषणाचे वृत्त समजताच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन स्वीच ऑफ येतो. 

एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिला आहे. त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य वाटले. पवारसाहेब आणि मी निवडणूक असो किंवा नसो, कायम गाठीभेटी घेत असतो. आम्ही २०१४ ला वेगळे लढलो, २००९ ला मी आणि पवारसाहेब स्वतः प्रचाराला गेले होते. यावेळी अजून जागांची चर्चाही झाली नाही,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सांगलीत नगरसेवकांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या सभेत राष्ट्रवादीवर घणाघात केला होता. त्यांचा संपूर्ण रोख हा अजित पवार यांच्यावर होता. त्यांनी म्हटले होते की, आमच्यावर सभ्यतेचे संस्कार आहेत. पण राष्ट्रवादीने त्याचा गैरफायदा घेतला. एक नाही तर पाच लोकसभा निवडणुकीत त्यांचे (पवार) काम केले. पण आम्हाला काय मिळाले, असे म्हणत, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा निघाली तेव्हा इंदापूरमध्ये येणार नव्हती. पण मग अचानक कशी आली, असा सवालही त्यांनी केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Assembly election 2019 shocked after harshvardhan patils accusation says ncp leader supriya sule