पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदी बाहेरचाः चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उदयनराजे हे राजे असून त्यांची जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा असल्यास ती देखील पूर्ण केली जाईल. उदयनराजे येणार असून त्यांचे पक्षात स्वागतच असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर नारायण राणेंचा पक्षप्रवेश हा माझ्या ताकदीपलीकडचा असल्याचेही ते म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ज्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. त्यातील काहींचा एक तारीख आणि काहीं नेत्यांचा त्यानंतर होणार्‍या कार्यक्रमादरम्यान पक्ष प्रवेश होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर; उध्दव ठाकरेंची घेतली भेट

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चा करून नारायण राणे यांच्याबाबत निर्णय घेतील. तसेच त्यांना माझ्याकडून प्रयत्न करायच म्हटले, तर नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदीच्या पलीकडचा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आमची महायुती होणारच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, यंदा गणपती देखावे ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ पर्यंत खुले राहणार आहे. यापूर्वी केवळ शेवटचे चार दिवस होते. पण यंदा त्यात वाढ करून सहा दिवस रात्री बारापर्यंत देखावे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला बोलावले पण गेटवर अडवले; शिवसेना आमदार संतप्त

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election 2019 chandrakant patil speaks on udyanraje bhosale narayan rane mahajanadesh yatra