पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्याविरोधात आता पुण्यातही आसामी लोकांची निदर्शने

पुण्यात राहणाऱ्या आसामी लोकांनी निदर्शने केली. (फोटो - धीरज बेंगरूट)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बुधवारी सकाळी पुण्यात राहणाऱ्या आसामी लोकांनी निदर्शने केली. हा कायदा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी निदर्शकांनी केली. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानाजवळ ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांमध्ये सुमारे २०० नागरिक सहभागी झाले होते.

एकनाथ खडसे खरंच भाजपला अलविदा करणार का याकडे राज्याचे लक्ष

आसामी लोकांकडून १५ डिसेंबरलाच निदर्शनांसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. फर्ग्युसन महाविद्यालयाबाहेर त्यावेळी ही निदर्शने करण्यात येणार होती. पण पुणे पोलिसांनी त्यावेळी परवानगी नाकारली होती. त्यानंतर सातत्याने आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात येत होती. अखेर पोलिसांनी परवानगी दिल्यावर बुधवारी सकाळी शांततामय मार्गाने निदर्शने करण्यात आली. या ठिकाणी सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुण्यात सध्या आसाममधून आलेले सुमारे २० हजार नागरिक राहात आहेत.

'जे आधीपासून पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना आपले नागरिकत्व का?'

आंदोलनाच्या प्रमुख आयोजक विद्युत सैकिया म्हणाल्या, आज आम्ही करीत असलेल्या निदर्शनांसाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पोलिसांनीही आम्हाला परवानगी दिली आहे. आसाममध्ये राहणारे आमचे लोक सध्या अत्याचार सहन करीत आहेत. तीच परिस्थिती इथे निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहोत.