पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उपयोग नाही, ओवेसींची टीका

एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी

काँग्रेस पक्ष आता कमजोर झाला असून, कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी काहीच उपयोग होणार नाही. काँग्रेसमध्ये आता काहीच राहिलेले नाही, असे सांगत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी पुण्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी संध्याकाळी पुण्यामध्ये ओवेसी यांची प्रचारसभा झाली. 

... यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

एमआयएमने पुण्यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये हिना मोमीन, हडपसरमध्ये जाहीद शेख, वडगावशेरीमध्ये डॅनियल लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावर ओवेसी यांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची अवस्था अजून वाईट झाली असल्याचे सांगून त्यांनी आता लोकांना एमआयएम हा सक्षम पर्याय वाटू लागला असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने भोपाळ मतदारसंघातून प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्यावरही त्यांनी पुन्हा एकदा टीका केली. पाकिस्तानी दहशतवाद्यांशी दोन हात करताना ज्यांनी आपले प्राण वेचले. त्यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. देशात झुंडबळीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या मुद्दयावरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली.