पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही: शरद पवार

राज ठाकरे आणि शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी देशातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांनी नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतली. माझी देखील त्यांनी भेटली घेतली. आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली. आगामी विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, यासाठी मनसे आग्रही आहे. याबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. मतपत्रिकेवर निवडणूक न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मनसेने मांडली आहे. परंतु, त्यांची ती भूमिका मला मान्य नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कशीची भीती दाखवून नेत्यांना धमकावलं जातंय, शरद पवारांचा सरकारवर आरोप

मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, यासाठी देशातील अनेक पक्ष न्यायालयात गेले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच मनसेला आघाडीत घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप पर्यंत झाला नाही. मनसेला आघाडीत घेण्याबाबत काही चर्चा झाली का त्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.

आमच्याकडील भाकड गायी भाजप-सेनेत गेल्याने दुःख नाही : जयंत पाटील

राज्यात काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये २४० जागांवर चर्चा झाली असून उर्वरित जागांसाठी घटक पक्षांसोबत लवकरच चर्चा करून त्याबाबतची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

'चौकशीचा ससेमिरा, कारखान्यांची थकित ऊसबिले यामुळे नेत्यांचे पक्षांतर'