पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात कठोर निर्बंध! या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा

पुणे शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीतील परिसरात कठोर निर्बंध (संग्रहित छायाचित्र)

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीतील परिसरात ३ मेच्या मध्यरात्रीपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.  या काळात या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत केवळ दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी यासंदर्भात आदेश काढले असून या परिसरात औषधे आणि दूध वगळता सर्व प्रकारच्या विक्रीस  मनाई करण्यात आली आहे.

दिलासादायक! कोरोनाग्रस्तांचा दुप्पटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर

दुधाच्या वाहतुकीवर बंधन घालण्यात आले नसून सकाळी सहा ते दहा या वेळेत दूध विक्रीची घरपोच सेवा  सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून धान्य वितरित करण्यात येत असून त्यास मनाई करण्यात आलेली नाही. या प्रतिबंधीत क्षेत्रामधील किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन,अंडी आदी विक्री केंद्र, दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. 

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध

शहरात ज्या भागात निर्बंध लागू राहणार आहेत तो परिसर खालीलप्रमाणे

-समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.
परिमंडळ दोन
-स्वारगेट  पोलिस ठाणे - गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी
-लष्कर पोलिस ठाणे- नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रस्ता, मोदीखाना कुरेशी मशिदीजवळचा परिसर, भीमपुरा गल्ली, बाबाजान दर्गा, क्वाटरगेट रस्ता, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक रस्ता, शितळादेवी मंदिर रस्ता.  
-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता
सहकारनगर पोलिस ठाणे- तळजाई वसाहत, बालाजीनगर
परिमंडळ तीन
- दत्तवाडी पोलिस ठाणे-  पर्वती दर्शन परिसर
परिमंडळ चार
- येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्राचौक परिसर
- खडकी पोलिस ठाणे- पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: all shops excluding hospitals and medical stores in 23 hotspots between May 1 May 3 Closed In Pune areas Milk shops will open Pune Joint Police Commissioner Ravindra Shisve issues order