पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! महाराजाकडून शिष्याला कोमात जाईपर्यंत मारहाण

महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अध्यात्माचे पाठ देणाऱ्या महाराजाने आपल्या शिष्याला बेदम मारहाण करुन कोमात घालवल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथे घडल्याचे समोर आले आहे. मारहाणीनंतर शिष्य तब्बल सात दिवस कोम्यात होता. भगवान पोव्हणे असं त्या महाभाग महाराजाचे नाव आहे. याप्रकरणात महाराजावर आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतने केली आत्महत्या

१० फेब्रुवारीला महाराजाने अकरा वर्षीय ओम चौधरीला हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याचा जाब विचारत लाकडी काठीने शिष्याला बेदम मारहाण केली. हात, पाय, पाठ आणि छातीवर काठीने प्रहार केला. मारहाणीनंतर महाराजाने ओमला औरंगाबादला नेले. यावेळी ओम बेशुद्ध अवस्थेत होता. त्याने विद्यार्थ्याच्या आईला तो आजारी असल्याची थाप मारली. 

सोलापूरात एसटी आणि जीपमध्ये भीषण अपघात; ४ जण ठार

तिथून त्याला पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात आणलं गेलं. ओमची आई त्याच रुग्णालयात झाडू-पोचाचे काम करायची. १२ फेब्रुवारीला रात्री ओमवर तातडीने उपचार सुरू झाले. तो कोमात गेला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अन् तब्बल सात दिवसांनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला तो शुद्धीत आला. जीवदान मिळालेल्या ओमने घडला प्रकार आईला सांगितला आणि ही धक्कादायक बाब समोर आली. 

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात

ओमच्या छातीत पाणी झाल्याचं, तसेच रक्तस्त्राव होण्याची चिन्ह ही आहेत. याप्रकरणी महाराजावर आळंदी पोलिस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमची  प्रकृती अद्याप ही चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्याला पिंपरीतील डॉ डी वाय पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.