पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फुशारक्या मारत नाही पण एक लाखाच्या फरकाने मी जिंकेन - अजित पवार

अजित पवार यांना पत्रकार परिषदेवेळी अश्रू अनावर झाले (फोटो - कुणाल पाटील)

मी फुशारक्या मारत नाही. पण बारामती मतदारसंघातून मी किमान एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होईन, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केला. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार यांनी रॅली काढली होती. त्याला बारामती शहरात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना सव्वा लाखांचे मताधिक्य मिळाले होते. मी कोणतीही फुशारकी मारत नाही. पण या निवडणुकीत माझा किमान एक लाखांच्या मताधिक्याने विजय होईल. मी आतापर्यंत कोणतीही निवडणूक हलकेपणाने घेतलेली नाही. माझ्याविरुद्ध आतापर्यंत मोठे नेते विरोधकांकडून देण्यात आले. तरीही बारामतीकरांनी माझ्यावरच विश्वास टाकला होता.

कोणताही उमेदवार बाहेरच नसतो
बारामती मतदारसंघातून भाजपने गोपीनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. गोपीनाथ पडळकर हे मूळचे सांगलीचे आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य घटनेने कोणालाही कोणत्याही मतदारसंघातून उभे राहण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार बाहेरचा नसतो. मी तरी असे काही मानत नाही. मतदारही मत देताना उमेदवार आपल्या मतदारसंघातील आहे की बाहेरचा हे बघत नाहीत. उमेदवार आपल्या मतदारसंघातील कामे किती प्रभावीपणे करू शकेल, यावर ते मत देत असतात. 

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'

खडसे माझ्या संपर्कात नव्हते
भाजपचे नेते एकनाथ खडसे माझ्या किंवा जंयत पाटील यांच्या संपर्कात नव्हते, असाही खुलासा अजित पवार यांनी केला. काही माध्यमांमध्ये याबद्दलचे वृत्त देण्यात आल्याचे मी बघितले. पण ते चुकीचे होते. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे माझ्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.