पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: पुण्याच्या रुग्णालयातील भार कमी होणार, मुंबईतही यंत्रणा सज्ज

पुण्यातील रुग्णालयानंतर आता मुंबईतील रुग्णालयातही सुसज्ज यंत्रणा

राज्यातील कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी आता पुण्यातील रुग्णालयांना मुंबईतील रुग्णालयांचाही आधार मिळणार आहे. पुण्याप्रमाणेच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही भागात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला तर त्याचे रक्ताचे नमुने हे पुण्यातील नायर रुग्णालयातील कक्षात तपासणीला पाठवले जात होते. मात्र आता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात यासंदर्भातील कक्ष उभारण्यात आला असून याठिकाणीही तपासणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुण्यातील कक्षाचा भार हलका होणार आहे. 

Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय

मुंबई महानगर पालिकेने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत कस्तुरबा रुग्णालयात कोरोना विषाणूच्या चाचणीची यंत्रणा उभारली आहे. पुण्यातील रुग्णालयात उभारण्यात आलेले कक्ष आणि मुंबईतील रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या कक्ष यांच्यातील रिपोर्टस जुळून येत असून कोरोनाचा लगाम लावण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सुसज्ज असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 

प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी केंद्र उभारा: PMO

कस्तुरबा रुगालयासह भाभा रुग्णालय आणि अन्य दोन रुग्णालयामध्ये कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करण्याची सुविधा करण्यात येणार आहे. चार बेडची क्षमता वाढवून २५ ते १०० रुग्णांना निरिक्षणासाठी ठेवता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही काकणी यांनी दिली आहे. बुधवारी मुंबईत कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळले होते. त्यांचे प्राथमिक रिपोर्ट हे निगेटिव्ह असून त्यांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात येणार असून नेमके निदान पुण्यातील चाचणीनंतर स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.