पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : पुण्यातील हा परिसर सील करण्याचे आदेश

सील करण्यात आलेल्या परिसराचा गूगल मॅपचे छायाचित्र

शहर-परिसरातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पुणे महानगर पालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. महापालिकाहद्दीत 'करोना'च्या रुग्णांचे  प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरातील काही भाग 'सील' करण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

'तबलिगी समाजातील २५,५०० लोक विलगीकरण कक्षात'

या आदेशानुसार, शहरातील काही परिसरातील निर्बंध आणखी कठोर होणार आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेचे नवे आदेश लागू करण्यात येणार आहेत. शहरात  एका दिवसात ३६ कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील पुणे आरटीओ ते गुलटेकडी हा भाग सील करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे.

२४ तासांत कोरोनामुळे देशात २८ जणांचा मृत्यू, ७०४ नवे रुग्ण

गंज पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ ते गुलतेकडीपर्यंतचा परिसर सील करण्यात येणार आहे. त्या परिसरातून कोणाला ये- जा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, या भागात राहत असलेल्या नागरिकांना सर्वव जीवनावश्यक वस्तू तिथेच पुरवण्याची सोय करण्यात येणार आहे. एका दिवसात कोरोनाबधितांचा आकडा वाढल्याने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.