पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येवले चहामध्ये भेसळ; एफडीएच्या अहवालातून उघड

येवले चहा उत्पादनावर बंदीचे आदेश

जनसामान्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहा' ला अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका बसला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येवले चहामध्ये भेसळ असल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. या चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

केंद्राची बाजू ऐकल्याशिवाय CAA ला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

२४ सप्टेंबर २०१९ रोजी येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दिले होते. चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते. चहामुळे पित्त होत नाही, असा दावा केल्यामुळे सह आयुक्त एस. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. 

राज्यात सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची, मार्चमध्ये कायदा करणार

तसंच, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन आणि त्रुटीमुळे पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. येवले चहामध्ये मेलानाईटचा वापर केला जात असल्याचे वृत्त पसरल्यानंतर एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी केली होती. 

मनसे हिंदुत्वाची कास धरणार?, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

चहा पावडर, चहा मसाल्याचे नमुने आणि सहा लाखांचा साठा एफडीएने जप्त केला होता. हे सर्व अन्न पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत हे उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते. 

CAA संपूर्ण देशात लागू करूनच दाखवा, प्रशांत किशोर यांचे प्रत्युत्तर