पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला सासवडजवळ अपघात

दिग्दर्शक प्रविण तरडे

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रविण तरडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. सासवडजवळील हिवरे गावात हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणे उपस्थित होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

भायखळ्यातील लाकडाच्या वखारीला भीषण आग

प्रविण तरडे हिवरे गावातून जात असताना महादेव मंदिरासमोरच त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर लगेच गाडीतील एअर बॅग्स उघडल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. अपघातामध्ये प्रविण तरडे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रविण तरडे, रमेश परदेशी आणि विशाल चांदणे हे सुखरुप असल्याने कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे. 

इम्रान खान भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याच्या विचारात

दरम्यान, मंगळवारी प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या कारला इंदापूरजवळ अपघात झाला. सुदैवाने आनंद शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. परंतु, त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.  मंगळवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास हा अपघात झाला. आनंद शिंदे यांची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचार करुन त्यांना सोडण्यात आले होते. 

पूर्व कमांड लष्कर प्रमुख म्हणाले, आता चीनची दादागिरी चालणार नाही