पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेलचे अधिग्रहण कराः अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. शनिवारी पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.

धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री

पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड-19 बद्दल  जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती जाणून घेतली.
 
या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

क्वारंटाईन सेंटरर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल किंवा खासगी शैक्षणिक संस्थांची अथवा खासगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्ट खाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी.

तसेच ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतिरिक्त ५५ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यात 8 वा, 9 वा आणि 10 वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे,असे आदेश दिले.

ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले? आता नियमित पत्रकार परिषद बंद

पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी सामाजिक अंतराचे पालन होऊन, परिणामी कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल.  

ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार किंवा दमा असेल, अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तसेच राहण्याच्या अडचणीबाबत पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत उपलब्ध केलेल्या जागेत राहण्यासाठी जाता येईल, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ट्रक डायव्हर मित्रांकडे पत्ते खेळायला गेला, २४ जणांना कोरोनाची लागण

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Acquire private hospitals education organisation and hotels for amid coronavirus outbreak in pune