पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-सातारा महामार्गावर ट्रक-दुचाकीची धडक; ३ ठार, ५ जखमी

अपघात (प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे-सातारा महामार्गावर शिवापूर फाट्याजवळ सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कामोठेः भरधाव कारच्या धडकेत ७ वर्षांच्या मुलासह दोघे ठार, ५ जण जखमी

मृत व जखमी तरुण हे पुण्यातील तळजाई टेकडी परिसरातील असल्याचे समजते. हे ८ तरुण पार्टी करुन तीन दुचाकीवर शिवापूर दर्ग्याच्या दर्शनाला निघाले होते. त्यांच्या दुचाकीला शिवापूर फाट्यानजीक कोंढणपूरजवळ ट्रकने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. 

पुणे अपघात : जाताना जिथे सेल्फी काढला, येताना तिथेच मृत्यूने गाठले!