पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची नारळाच्या ट्रकला धडक, ३ ठार

अपघातानंतर घटनास्थळी घेतलेले छायाचित्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ढेकू गावाजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला नारळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरने तीव्र उतारावर असताना पाठीमागून जोराची धडक दिली. यात ट्रक रस्त्याच्या कडेला ५० ते १०० फूट खाली पडल्याने ट्रकमधील दोघांचा आणि ट्रेलर चालकाचा असा तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी मोठ्याप्रमाणात नारळांचा खच पडला होता. यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

आणखी एक घोटाळाः गुडविन ज्वेलर्सकडून कोट्यवधींची फसवणूक

अधिक माहिती अशी, पु्ण्याहून मुंबईला नारळ घेऊन जात असलेला ट्रक ढेकु गावाजवळील तीव्र उतारावर आला असता त्याचवेळी एक भरधाव ट्रेलर पाठीमागून आला. या ट्रेलरचा ब्रेक निकामी झाला होता. ट्रेलरने ट्रकला मागून जोराची धडक दिली. यामुळे ट्रक महामार्गाच्या कडेला सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी पट्ट्या तोडून सुमारे ५०  ते १०० फूट खाली कोसळला. यात ट्रकमधील दोघांचा मृत्यू झाला. तर ट्रेलरमधील चालकाचाही यात मृत्यू झाला. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात नारळ पडले होते. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिस अधिक तपास करत आहेत.