पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघे ठार, १६ जखमी

अपघातानंतर बसची झालेली अवस्था

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघे जण मृत्युमुखी पडले तर १६ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात एका आराम बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक एवढी जोरात होती की आराम बसमध्ये बसलेले तीन प्रवासी जागीच ठार झाले. अन्य प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसमधील प्रवासी मुंबईहून मतदान करण्यासाठी पाटसला निघाले होते.

Maharashtra Election 2019 Live : उदयनराजे भोसलेंनी सहकुटुंब केले मतदान

पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या ट्रकचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो बदलण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी मागून आलेल्या आराम बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक जोरात होती. त्यामुळे बसच्या पुढील बाजूस बसलेले तीन प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधील अन्य १६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहा महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. सर्व जखमींना निगडीतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.