पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्स्प्रेस वेवर अपघातात पुण्यातील डॉक्टरांसह दोघांचा मृत्यू

डॉ. केतन खुर्जेकर

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका भीषण कार अपघातात पुण्यातील शल्यविशारद डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टर केतन खुर्जेकर असे त्यांचे नाव आहे. या अपघातात त्यांच्या गाडीचा चालकही मृत पावला आहे. अन्य दोघेजण यात गंभीर जखमी झाले आहेत.

लोकशाहीच्या खुनाबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार आहे का - मुख्यमंत्री

पुण्याच्या अलीकडे गहुंजे गावाजवळ ही घटना घडली. डॉ. खुर्जेकर हे कारने पुण्याकडे परतत होते. गाडीचे टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला त्यांच्या गाडीचा चालक टायर बदलत होता. त्यावेळी भरधाव बसने या गाडीला मागून जोरात धडक दिली. यामध्ये खुर्जेकर आणि त्यांच्या गाडीचा चालक दोघेही मृत पावले. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांचे निधन

केतन खुर्जेकर हे मणक्यांशी संबंधित आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्यात प्रसिद्ध होते. ते संचेती रुग्णालयात कार्यरत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूचे समजल्यावर पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.