पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; तिघे जखमी

धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाहनांच्या ताफ्यातील वाहनाला रविवारी सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. ज्या वाहनाला अपघात झाला. त्यात मुंडे हे नव्हते. ते दुसऱ्या गाडीत होते. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. ज्या गाडीला अपघात झाला त्यात दोन चालक आणि अंगरक्षक किरकोळ जखमी झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सातच्या सुमारास, मुंडे यांच्या वाहनांचा ताफा द्रुतगती मार्गावरून जात असताना लोणावळ्याजवळच्या औंढे पुलानजीक अपघात झाला. अपघातग्रस्त गाडीत धनंजय मुंडे नव्हते. ते दुसऱ्या गाडीत होते. मुंडे यांनी मुंबईला पोहोचताच स्वत: ट्विट करून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. त्यात  चालक व्यंकट गित्ते आणि संतोष जाधव तसेच अंगरक्षक सोपान चाटे हे जखमी झाले. अपघातग्रस्त गाडीत दोन चालक, एक अंगरक्षक होते. ते आणि मीही सुखरूप आहेत. इतर कुठल्याही बातमी व अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत, असे मुंडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.