पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे महामार्गावर शालेय बसचा अपघात, १५ विद्यार्थी जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर शालेय बसचा अपघात

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे तळेगाव मार्गावर हा अपघात घडला असल्याचं समजत आहे. 

'मुस्लिमांकडे राहण्यासाठी १५० देश आहेत, हिंदूजवळ केवळ भारत आहे'

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसनं पाठीमागून जोरदर धडक दिली. बसमध्ये ४० हून अधिक विद्यार्थ्यी होते, जोरदार धडक बसल्यानं १५ विद्यार्थी आणि ३ शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ऊस रस्त्यावर सांडल्यानं जुन्या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

काश्मीर खोऱ्यातून सात हजार जवान माघारी, गृहमंत्रालयाचा निर्णय