पुणे-मुंबई महामार्गावर एका भरधाव टेम्पोने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सहा जणांना चिरडले. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास अंडा पॉईंटजवळ घडली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. या अपघातात एक जण थोडक्यात बचावला. हे सर्वजण लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते, असे सांगण्यात येते. टेम्पो चालक फरार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. अद्याप मृतांची नावे समजू शकलेली नाही. परंतु, हे सर्वजण पिंपरी चिंचवड परिसरातील असल्याचे सांगण्यात येते.
'त्या' काळी फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते : राज ठाकरे
Maharashtra: Five people dead and one injured after a collision between three motorcycles and a truck in Raigad district on Pune-Mumbai Highway last night. pic.twitter.com/axdimicGSP
— ANI (@ANI) March 2, 2020
अधिक माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळताना आयशर टेम्पोने (एमएच १२ सीव्ही ०२४३) सहा जणांना चिरडले. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास खंडाळा अंडा पॉईंट येथे ही घटना घडली. सहा जण तीन दुचाकीवरून अलिबागला गेले होते. परतत असताना ते अंडा पॉईंट येथे लघुशंकेसाठी थांबले होते. अचानक भरधाव आलेल्या टेम्पोने त्यांना चिरडले. त्यानंतर तात्काळ महामार्गावरील पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पण यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. टेम्पो चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.
तृणमूल काँग्रेसचा शहांवर पलटवार, तुम्ही अगोदर दिल्ली सांभाळा!