पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: पुण्यात वर्दीतील योद्ध्यांनी केली गाण्यातून जनजागृती

पुण्यातील धनकवडी पोलिसांनी गाण्यातून नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन केले.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाची चांगलीच कसरत सुरु आहे. नागरिकांनी नियमाच पालन करुन सरकार आणि प्रशासनाला या लढ्यात साथ द्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. 
पुणे पोलिसांनी गाण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. एएनआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे येथील धनकवडी पोलिसांच्या टीमने 'लगान' चित्रपटातील 'अपनी जीत हो उनकी हार हो..' या गाण्याच्या सूरात कोरोनाविषयी गाणे गात घरातून बाहेर पडू नका, असा संदेश दिला.

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू

'एक देश हा एक भावना, तोडू साखळी रोखू कोरोना! 
वाचवू चला सगळ्यांना नका फिरु.., घरी थांबूनी मोलाची मदत करु!'
 

अशा शब्दांत पोलिसांनी नागरिकांना घरात बसण्याचा संदेश दिला. स्वच्छता राखून कोरोना विषाणूलाला आपल्यापासून दूर ठेवायचे आहे, असेही या गाण्यातून सांगण्यात आले. देशासाठी ही नवीन समस्या असून एक नवा आदर्श निर्माण करुन आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, अशा शब्दांत पोलिसांनी नांगरिकांमध्ये जनजागृती केली. कोरोना विषाणूचे राज्यातील वेगाने होणारे संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. घरातून थांबून कोरोना विषाणूला आपण  उंबरठ्यावरच रोखायच आहे, असा संदेश यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

जगात दीड लाख कोरोनाग्रस्त रुग्ण बरे,८० % जणांना रुग्णालयाची नाही गरज

यासाठी सरकारने कठोर पावलेही उचलली आहेत. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्यानंतर केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नियमांचे उल्लंघन करुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्याची वेळ आली आहे. काही भागात घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिल्याचेही पाहायला मिळाले आहे. पुण्यात अनोख्या पद्धतीने जनजागृती करत पोलिसांनी नागरिकांना कोरोनाविरोधात लढण्याचे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A team of Pune Polices Dattawadi police station sing a song to create awareness about Coronavirus WATCH Video