पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसाचे रंग : प. महाराष्ट्र, कोकणात दमदार; विदर्भ, मराठवाड्यात अद्याप प्रतिक्षाच

पाऊस

पावसाळ्याचे दिवस म्हणून ओळखले जातात, असे जुलै महिन्याचे निम्मे दिवस सरले आहेत. पण महाराष्ट्रातील चित्र विरोधाभासानी भरलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत असताना मराठवाडा आणि विदर्भ अद्याप कोरडा आहे. जर पाऊस आणखी लांबला तर या विभागातील शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जून ते १४ जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे २० आणि १५ टक्के सरासरीच्या अतिरिक्त पाऊस पडला आहे. पुण्यातही जून आणि जुलैच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पण पुण्यापासून सुमारे २५० किलोमीटरवर असलेला बीड जिल्हा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. 

यंदा मोसमी पावसाचे महाराष्ट्रात उशीरानेच आगमन झाले. पुण्या-मुंबईमध्ये तो नेहमीपेक्षा १० ते १३ दिवस उशीराने २० जूनला आगमन आला. पण जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने जोर पकडला. पण या सगळ्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांत अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेतच आहे.